श्री सप्तश्रुंग गड स्थान महात्म्य
गजानन महाराज मंदिर, त्रिंबकेश्वर
------------------------------------------------------------------------------------------
चांदवडची रेणुका देवी
श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड, नाशिक.
श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई ...
श्री मारुती देवस्थान, अगर टाकळी - नाशिक.
हातगड किल्ला
रामशेज किल्ला
श्री सप्तश्रुंग देवी आद्य शक्तीपीठ : -
प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनातील शक्ती उपासनेला विशेष महत्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून उपासकांना त्यामुळे त्याचा लाभ झालेला आहे. या शक्तीपीठांपैकीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी ओमकार स्वरुपात आधिष्टीत आहे आणि तेच म्हणजे सप्तश्रुंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. दृष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. येथे या देवीची स्वयंभू अशी मूर्ती आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत काही काल थांबले. तेव्हा सीतामाई सोबत त्यांनी भगवतीचे दर्शन घेतले असाही उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. त्यापैकी त्रिगुणात्मक स्वरुपात आद्यस्वयंभू शक्तीपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर हे ठिकाण आहे.
------------------------------------------------------------------------------------------
त्र्यंबकेश्वर
नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. पवित्र गोदावरीचे उगमस्थान, भोलेनाथाने काहीकाळ निवास केलेला ब्रम्हगिरी पर्वत, निवृत्तीनाथ महाराजांची समाधी, नागपंथी आखाडा ह्या ठिकाणांमुळे संपूर्ण भारतात त्र्यंबकेशवर हे ठिकाण एक तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा फेरीसाठी असंख्य भाविक येथे येतेत पण स्थानिक मंडळी हि वैकुंठ चतुर्दशी ह्यादिवशी प्रदक्षिणेला जास्त महत्व देतेत तसेच अधिक मासातहि त्याचे महत्व अधिक आहे.
कुशावर्त
नाशिकच्या रामकुंड इतकेच महत्व कुशावर्त तीर्थस्थानाचे आहे. ह्या तीर्थास चारही बाजूने उतरण्यास पायऱ्या आहेत मध्यभागी लहान कुंड आहे. पूर्व बाजू खुली असून. तिन्ही बाजूस ओवर्या आहेत यास तीन दरवाजे आहेत. नैरुत्तेस गणपतीची मूर्ती तीनही देवळात महादेवाच्या पिंडी आहे. एका ठिकाणी शेषशायी भगवानाची मूर्ती असून तिच्या खालून पाणी येते असे म्हणतात. गौतमऋषींनी गुप्त होणार्या गोदा प्रवाहास आपल्या कुशाचे (दर्भाचे) आवर्त म्हणजे आवरण घालून अडविले व गंगास्नान केले व नंतर श्री सिद्धिविनायक व श्री केदारेश्वर यांच्यासमोर प्रायश्चित्त घेवून गोहात्यापातकापासून मुक्ती मिळवली. त्याच जागेला कुशावर्त म्हणतात.
रथयात्रा
श्रावणातल्या हिरव्यागार ऋतूनंतर येतो तो कार्तिक महिना. संपूर्ण त्र्यंबकेश्वर कार्तिक महिन्याची वाट पाहत असतो. कारण कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेला भगवान त्र्याम्बकेश्वराची रथयात्रा येथे असते.
------------------------------------------------------------------------------------------
गजानन महाराज मंदिर, त्रिंबकेश्वर
ह्या संस्थे तर्फे त्रिंबकेश्वर येथे भव्य श्री गजानन महाराज ह्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे.
त्रिंबकेश्वर गावात प्रवेशाच्या ठिकाणी डाव्या बाजूला हे भव्य मंदिर आहे.
येथे रम्य वातावरणात भक्त निवासाची व भोजनाची अल्प दारात सोय करण्यात आली आहे.
(भोजनाची वेळ : सकाळी १०.३० ते १.३० व सायंकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत आहे.)
------------------------------------------------------------------------------------------
चांदवडची रेणुका देवी
मुंबई आग्रा रोड वर डोंगराच्या गुहे मध्ये सुप्रसिद्ध पुरातन कालीन स्वयंभू जागृत देवस्थान असून हे क्षेत्र साडेतीन पीठा पैकी अर्धे पीठ ओळखले जाते. जमदग्नी ऋषींच्या आज्ञे नुसार परशुरामाने स्वतःच्या आईचे शीर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले. धडाचा भाग माहूर (तालुका किनवट जिल्हा नांदेड) येथे असून शीर चांदवड येथे आहे. महाराष्ट्राचे दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगत्जननी चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता होय.
---------------------------------------------------------------------------------
श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड, नाशिक.
* त्रेतायुगात वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी या नागरी वरून प्रयाण केले. चंद्रेश्वर परिसरातून जातांना त्यांना तहान लागली. पाणी नसल्याने त्यांनी पाण्यासाठी जमिनीत बाण मारला. जमिनीतून पाणी निघाले. ती जागा म्हणजे ह्या मंदिरा जवळील गणेश टाके होय. हे पाणी कधीही आटले आसे स्थानिक लोकांना आठवत नाही.
* विक्रम राजाला शनी देवाचा प्रकोप झाला. त्याच्या परीमार्जनासाठी विक्रम राजाने ह्याच चंद्रेश्वर गडावर घोर तपश्चर्या केली, त्यावेळी भगवान शंकराने प्रसन्न होवून विक्रम राजाला दर्शन दिले व शनीच्या प्रकोपातून मुक्तता केली. मुक्ती मिळाल्यानंतर चंद्रकला ह्या राजाचंद्रसेनच्या एकुलत्या एक मुलीबरोबर विक्रम राजाचा विवाह झाला.
* हे देवालय पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी म्हणून ओळखली जात आसे. मोठमोठ्या संतांनी - ऋषीमुनींनी येथे तपश्चर्ये साठी वास्तव्य केले आहे.
(माहिती संकलनासाठी मला स्वामी जयदेवपुरी (चंद्रेश्वर येथे राहतात) व श्री राजेंद्र काळे, चांदवड ह्यांची मदत झाली.)
------------------------------------------------------------------------------------------
श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई ...
हे तीर्थ स्थान ११ लाख ३२ हजार वर्ष प्राचीन आहे. ह्या तीर्थावर सर्व प्रथम कुंभ मेला भारत होता. येथे स्नान केल्यावर गंगा सागर तीर्थाचे पुण्या प्राप्त होते. ह्या तीर्थावर सत्युगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्य शास्त्राचे उपदेश देवून स्वर्गाला पाठविले त्यामुळे हे तीर्थ मातृ गया झाले. ह्या ठिकाणी भगवान राम व भगवान शंकराची भेट झाली. लक्षुमणाला शक्ती लागल्यावर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरून जात असतांना काल्नेमी राक्षसाचा वध केला त्यामुळे ह्या गावाचे नाव कावनई पडले. ह्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ब्राम्हणाच्या मुलाला जल पाजून जिवंत केले. ह्या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिले. ह्या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहेत.
इगतपुरीच्या अलीकडे मुंबई आग्रा रोड वर ह्या ठिकाणी जाण्याचा फाटा आहे.
------------------------------------------------------------------------------------------
श्री मारुती देवस्थान, अगर टाकळी - नाशिक.
राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी महाराजांनी टाकळी या ठिकाणी सन १६२१ ते १६३३ पर्यंत तपश्चर्या केली. याच परिसरात श्री समर्थांनी दसक पंचक गावचे श्री कुलकर्णी यांना मृतावस्थेतून जिवंत केले. नंतर श्री कुलकर्णी यांना पहिला मुलगा झाला त्या मुलाला त्यांनी श्री समर्थांना आर्पण केला. श्री समर्थांनी त्यांचे नाव उद्धव ठेवले.
इ. स. १६३० मध्ये श्री शहाजी राजे नाशिक मुक्कामी आले असतांना श्री समर्थांची महती त्यांना समजली. त्यांचे मनात श्री समर्थांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानुसार श्री शहाजी राजे श्री समर्थांना भेटण्यासाठी टाकळी गावी आले व बराच वेळ दोघांची एकांतात चर्चा झाली. अशा रीतीने या तापोभूमितच स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली.
इ. स. १९३३ मध्ये मार्च महिन्यात हमुमान जयंतीस गोमय मिश्रणाची श्री मारुतीरायांची मूर्ती त्यांनी येथे स्थापन केली. श्री समर्थांच्या कार्यातील प्रथम अशा या परम, पावन व रम्य तापोभूमीस अनन्यसाधारण विशेष महत्व आहे.
------------------------------------------------------------------------------------------
पांडव लेणी नासिक
प्राचीन काल में बौद्धधर्म कि संपन्नता के अवशेष संपूर्ण विश्व में बिखरे मिळते है | इन्ही प्राचीन बौद्ध अवशेष कि शृंखला कि पांडव गुफाओंकी एक कडी है | सह्याद्री पर्वत मला कि एक स्वतंत्र श्रुन्खाला त्रीरश्मी पर्वत के नाम से प्राचीन काळ से हि प्रसिद्ध है जो नासिक से ८ कि मी दुरी पार स्थित है |
त्रीरश्मी पर्वत के उत्तरी छोर पार धरातल से ७० - ८० मीटर उंची बौद्ध धर्मीय २४ गुफाये अपने प्राचीन काल के संपन्नता कि साक्षी है और दुसरी शताब्दी ई. सा. के गुंफा निर्माण पद्धती का उत्कृष्ठ आयना है |
त्रीरश्मी पर्वत के उत्तरी छोर पार धरातल से ७० - ८० मीटर उंची बौद्ध धर्मीय २४ गुफाये अपने प्राचीन काल के संपन्नता कि साक्षी है और दुसरी शताब्दी ई. सा. के गुंफा निर्माण पद्धती का उत्कृष्ठ आयना है |
----------------------------------------------
चांभार लेणी
नाशिकच्या उत्तरेस ८ कि.मी. अंतरावर जैनांची लेणी आहे त्यास चांभार लेणी असे म्हणतात. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. लेण्यात जाण्यासाठी असलेल्या पाहिऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मुर्त्या प्रथम दिसतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परस्नाथाची मूर्ती आहे. हि लेणी आकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत.
------------------------------------------------------------------------------------------
हरिहर किल्ला
त्र्यंबक - खोडाळा रस्त्यावर निरगुड पाडा हे गाव त्र्यंबकहून २१ कि.मी. आहे. ते किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. रस्ता ठीक आहे त्यामुळे वर्षभर कोणत्याही वाहनाने जाता येते. वर जाण्यासाठी काळ्या कातळात खोदलेल्या उभ्या दगडी पायऱ्या आहेत. त्यामुळे नवीन ट्रेकर्ससाठी हे एक आगळेच थ्रिल आहे. पावसाळ्यात शेवाळे असते त्यामुळे चढणे धोकादायक आहे. एक दिवस नाशिकहून जावून यायला लागतो. भास्कर गढ व कणीचा डोंगर हि दोन्ही स्थाने जवळ पास आहेत. हॉटेल, हॉस्पिटल, पोलीस ह्याच्यासाठी त्र्यंबकला जावे लागते.
------------------------------------------------------------------------------------------
हातगड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील हा ऐतिहासिक व प्राचीन किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार एकशे चौदा मीटर उंचीवर आहे. नाशिकहून सापुताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीने हातगढ या गावात उतरावे. पूर्वेला समोर हातगड किल्ला दिसतो. सापुताऱ्याच्या चार किलोमीटर अगोदर हातगड गाव लागते. उत्तम तटबंधी, बुरुज, राजवाड्याचे पडके अवशेष, पाण्याचे टाके, गुहा, टेहाळनिची जागा हि किल्ल्याची वैशिष्टे आहेत. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. पावसाळ्या नंतर भटकंतीस उत्तम ठिकाण आहे. राज्यभरातून गिर्यारोहक येत असतात. पावसाळ्यात हातगढ किल्ला परिसर हिरवाईने नटून जातो. ( लेख : संजय अमृतकर - सकाळ २७ एप्रिल २०१०)
रामशेज किल्ला
नाशिक - पेठ रस्त्यावर नाशिकहून १३ किलोमीटरवर हा किल्ला आहे.
जवळच आशेवाडी गाव आहे.
हॉटेलची सोय नाही. एका दिवसात हि सहल होवू शकते.
हॉटेलची सोय नाही. एका दिवसात हि सहल होवू शकते.
------------------------------------------------------------------------------------------
नांदूर मधमेश्वर (पक्षी अभयारण्य)
महाराष्ट्राचे भरतपूर ओळखले जाणारे हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. गोदावरी आणि कडवा नदीच्या संगमावर बांधलेल्या धरणामुळे उथळ अश्या पाण्याचा तलाव आहे. ह्या पाण्यात पक्ष्यांना आवडणारे २४ प्रकारचे मासे आढळतात. तसेच साप, मुंगुस, पाणमांजर, असे अनेक प्राणी बघायला मिळतात. १३० प्रकारचे प्लांट्स येथे आहेत. येथे अंदाजे 238 प्रकारचे पक्षी भ्रमंती करत येतात असे पक्षी मित्रांचा अभ्यास आहे. मुख्य सायबेरिया, युरोप, उत्तर - मध्य आशिया, तिबेट, लाधक, आणि हिमालयातून येथे पक्षी येतात. हिवाळ्यात खूप पक्षी बघायला मिळतात. हिवाळ्यातच येथे वातावरण छान असते.
क्षेत्रफळ : १००.१२ स्क़े.कि.मी.
बस स्टेशन : निफाड १० कि.मी. , नाशिक ४० कि. मी.
रेल्वे : निफाड १० कि.मी. नाशिक ५२ कि.मी.
राहण्याची व्यवस्था: इर्रीगेषण खात्याचे रेस्त हौस (आधी नाशिकला परवानगी काढावी लागते)
उत्कृष्ठ वेळ : नोव्हेंबर ते मार्च
------------------------------------------------------------------------------------------
गोवर्धनेश्वर महादेव मंदिर, गंगापूर गाव, नाशिक.
गोवर्धनेश्वर महादेव मंदिर, गंगापूर गाव, नाशिक.
गोदावरी नदीच्या उगमापासून ते राजमहेंद्री येथे समुद्रास मिळेपर्यंत गोदावरी तीरावर साडेतीन कोटी तीर्थे निर्माण झाली. अशा या तीर्थापैकी अति महत्वाचे तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गोवर्धनेश्वर या स्थानाचा महिमा महर्षी व्यासमुनींनी ब्राम्हपुरणात केलेला आहे. गौतम ऋषींच्या तपोबलाने अवतीर्ण झालेल्या गोदाकाठावरील गोवर्धनेश्वर क्षेत्राचा महिमा ब्रह्मदेवास माहित होता. एकेदिवशी नारादमुनिनी ब्रह्मदेवास विनंती केली कि आपण या क्षेत्राचा महिमा सांगावा. ब्रह्मदेवाने सांगितले या निसर्गरम्य घनदाट वृक्षांनी, लतावेलींनी नटलेल्या व गोदावारीमातेच्या जीवनदायिनी जलधारेची किनार असलेला प्रदेश, अशा या सुजलाम-सुफलाम भागात शेतकरी शेती करीत व शेतीकामासाठी बैलांची मदत घेत. त्यांच्याकडून भरपूर कामे करून घेऊन त्यांना चारा-पाण्याविना तसेच सोडून देत. अशा वेळी त्यांनी कामधेनुकडे तक्रार केली. कामधेनुने शंकर भगवानांकडे व्यथा मांडली. तेव्हा शिवशंकरांनी आपल्या नंदिंकडे काम सोपवले. नंदिनी निर्दयी शेतकऱ्यास धडा शिकवण्यासाठी या भागातील गोवंश खंडित केला. त्यामुळे गायीगुरांचे अस्तित्व संपुष्टात आले. शेती कामासाठी बैल मिळेना. ब्राह्मणांची यदने, होमहवन, इतर संस्कार बंद पडू लागले. होमहवन बंद पडल्याने देवतांची पृष्टी बंद झाली. सर्वत्र हाहाकार झाला. सर्वत्र त्राही त्राही स्थिती झाली तेव्हा सर्व देवगण ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. ब्रह्मदेवाने त्यांना शिवशंकराची आराधना करावयास सांगितले. सर्व देवता शिवशंकरांना शरण जावून प्रार्थना स्तुती करू लागले. भगवान शिवांनी प्रसन्न होवून देवगणास नंदीस शरण जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व देवगण नंदीस शरण गेले. नंदीने सर्व देवतांना सांगितले कि या ठिकाणी गोयज्ञ करावा. स्वर्गातील सर्व देवता पृथ्वीवर या ठिकाणी आले व त्यांनी मोठा गोयज्ञ करून शिवलिंगाची स्थापना केली. भगवान देवतांच्या भक्तीवर प्रसन्न झाले व या क्षेत्रास असा वर दिला कि जो कोणी मनुष्य गोदावरीत स्नान करून गोवर्धनेश्वर महादेवाचे दर्शन घेईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व त्याला सुवर्ण पर्वत दान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. अशा ह्या क्षेत्राला हजारो वर्षांपासून महत्व प्राप्त आहे.
नाशिक सी बी एस पासून (१० कि मी) गंगापूर रोड मार्गे गंगापूर गावात हे तीर्थ क्षेत्र आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
सांडव्यावरची देवी म्हणजे साक्षात सप्तश्रृंगनिवासिनी चे प्रतिरुप
देवीच्या साडेतीन पीठांतले महत्त्वाचे ‘सप्तशृंगनिवासिनी’चे अर्धेपीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरांची आणि भक्तांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत सप्तशृंगनिवासिनी देवीची मंदिरे स्थापन झालेली दिसून येतात. एकट्या नाशिक शहरात सप्तशृंगनिवसिनीची पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहेत. परंतु, त्या सर्व मंदिरांत पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरच्या देवीचे मंदिर आहे. थेट गोदापात्रातच हे मंदिर असल्यामुळे गोदावरीच्या पुरात मंदिर दर वर्षी न्हाऊन निघते. २०१६ साली नवरात्री सुरू होण्याला आठ दिवस राहिले असतानाच गोदावरीला महापूर आला होता. देवी मंदिराशेजारच्या नारोशंकराच्या घंटेला त्यावेळी पुराचे पाणी लागले होते. देवी मंदिर तर पूर्णपणे पुरात बुडून गेले होते. त्यावेळी मंदिर काही वाचत नाही असेच सर्वांना वाटत होते. परंतु, मंदिराचा पुढचा सभामंडप, फरशा आणि दीपमाळ पुरात वाहून गेले. देवी आणि तिचा गाभारा मात्र जसेच्या तसे सुखरूप राहिले. त्यानंतर मोठ्या घाईने नवरात्रीची तयारी करावी लागली. त्यावर्षीच चंद्रकांत राजेबहाद्दर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली. दगडी दीपमाळ हेदेखील सांडव्याच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते.
अठरा हातांची भव्य मूर्ती
सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.
गोदावरीच्या पत्रात हल्ली अनेक पूल तयार झालेले आहेत. पूर्वी मात्र एवढे पूल नव्हते. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा किंवा कॉजवे होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले.
सप्तशृंगगडावरची देवी थेट नाशिकला (गोदावरीत) कशी आली याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, ‘मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.’ आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सध्या नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
नारोशंकर राजेबहाद्दर यांचे दहाव्या पिढीतील वंशज
१. सदाशिव त्र्यंबक राजेबहाद्दर २. चंद्रकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ३. निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर ४. मधुसूदन त्र्यंबक राजेबहाद्दर आहेत. देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने दिले जातात.
देवी मंदिराशेजारी नारोशंकराचे मंदिर आहे. या मंदिरावरील मोठी घंटा हे नाशिकचे भूषण आहे. महापालिकेच्या लोगोमध्येसुद्धा या घंटेचा समावेश केलेला आहे. इसवी सन १७२१ मध्ये ही घंटा दोन हत्तींवरून नाशिकला आणली गेली होती. २०२१ मध्ये या घंटेचा तीनशेवा वर्धापनदिन आहे. (सौजन्य म. टा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------
श्री जगन्नाथ मंदिर
ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, इंदिरा नगर - पाथर्डी रोड, नाशिक
हे नाशिकमधील एकमेव जगन्नाथ मंदिर आहे जे अतिशय सुंदर रचले गेले आहे. मंदिराचा परिसर चांगला आणि भक्तीपूर्ण आहे. मंदिराची वास्तुकला अत्यंत अव्दितीय आहे.- पुरीच्या मूळ जगन्नाथ मंदिरपासून प्रेरित आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------